शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत आहेत. दरम्यान, “महाविकास आघाडीत पूर्णपणे समन्वय असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोल, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यात उत्तम संवाद आहे. सारी गणितं ठरलेली आहेत आणि याचा निकाल संध्याकाळी तुम्हाला दिसेल” असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
तसेच राज्य सभेत जे काही झालं ते पुन्हा होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने काळजी घेतली आहे, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे. अशातच आम्हाला आमच्या विजयाचा विश्वास आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल पण कोणते ते माहित नाही, असं सूचक विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Advertisement