शबनम न्युज | पुणे
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर आयोजित ट्रान्सकुक कुकरी कॉम्पिटिशन फॉर तृतीयपंथी महिला थाटा माटात साजरी झाली. पुण्यातून सहा तृतीयपंथी यांनी स्वतःला सिद्ध करत शेफ ही पदवी मिळवली. जिल्हा लेवल वर संपन्न झालेली ही कुकरी कॉम्पिटिशन मध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर अशा पाच शहरातून तृतीयपंथी यांनी सहभाग घेतला होता. पुण्याच्या टीम चे नेतृत्व कादंबरी यांनी केला होत.
प्रथम क्रमांकावर दीड तासात तब्बल 12 डिश बनविण्याचा विक्रमी रेकॉर्ड पुण्याच्या टीम निगार शेख आणि निकीता मुख्यदल यांनी पटकाविला. तर पुण्याच्या संतोषी कदम आणि तलाश ठाकूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मोनिका राजपूत आणि शायना खुडे यांनी लज्जतदार पदार्थ बनवून परीक्षकांची मन जिंकली.
विष्णु जी की रसोई (पुणे – नागपूर) प्रस्तुत ह्या कॉम्पिटीशन चे पार्टनर स्व. मोरू भाऊ सातपुते होते, (स्मृती बहुउद्देशीय संस्था नागपूर), एम. जी. एम. युनिव्हर्सिटी – शेफ्स अनलिमिटेड तृतीयपंथी यांचा आवाज ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी महिला कादंबरी (पुणे), यांची मोलाची साथ लाभली. तृतीया फाऊंडेशन हडपसर, आणि मंगलमुखी कीन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे च्या सभासद असून तृतीयपंथी यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा तसेच विविध उपक्रमातून रोजगार, संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे अखंडित काम सुरू आहे.
विजेत्यांना शेफ चा ड्रेस, सर्टिफिकेट आणि रोख रक्कमेचा बक्षीस देण्यात आले. तृतीयपंथी यांच्या साठी रोजगार हमी आणि आवड जोपासण्यासाठी विविध कुकरी उपक्रम करण्याचे आश्वासन श्री विष्णु मनोहर यांनी दिले.