शबनम न्युज | मुंबई
एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आणि ‘तळगाळातील नेता’ म्हणून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शिंदे यांना राजकीय, विधीमंडळ आणि प्रशासकीय अनुभवांचा समृद्ध अनुभव आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, तळागळातील नेता हा आपल्यासोबत समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव घेऊन येतो. महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी शिंदे काम करतील असा मला विश्वास आहे. असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांचे अभिनंदन केलं आहे.
I would like to congratulate Shri @mieknathshinde Ji on taking oath as Maharashtra CM. A grassroots level leader, he brings with him rich political, legislative and administrative experience. I am confident that he will work towards taking Maharashtra to greater heights.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
Advertisement