शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील विठ्ठल प्रतिष्ठान वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सदर रक्तदान शिबिर संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे संपन्न होत असून या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट व इयर बर्ड्स ही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती रक्तदान शिबिराचे आयोजक, शिवसेनेचे युवा नेते ,तथा विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ,निखिल उमाकांत दळवी यांनी दिली आहे. सदर रक्तदान शिबिर सकाळी साडेदहा ते चार दरम्यान संपन्न होत आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन निखिल दळवी यांनी केले आहे.
Advertisement