शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा नूतन शहर कार्यकारणी प्रथम मासिक सभा आज काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी
आगामी पालिका निवडणुकीमध्ये युवकांना संधी देण्यात यावी अशी मागणी युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी पक्षश्रेष्ठी यांना केली.
युवक हा संघटनेचा कणा असतो सध्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व युवक ऍक्टिव्ह झालेले आहेत. गेल्या काही वर्षापासून युवक संघटनेत काम करणारे युवक यांनी कामाच्या जोरावर शहरात चांगला मतदार वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. आणि नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर सध्याचे युवक पदाधिकारी यांनी गेल्या चार महिन्यात केलेली कामे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास ते निवडणुकीत नक्कीच विजय मिळवतील अशी खात्री युवक अध्यक्ष यांनी व्यक्त केली.
शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या बद्दल बोलताना युवक अध्यक्ष म्हणाले “शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे हे सकाळी सहा वाजल्यापासून पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात करतात रात्री दहा अकरा वाजेपर्यंत प्रभाग दौरे, उद्घाटन, लोकांशी पक्ष कार्यालयामध्ये संपर्क, विविध सेलच्या अध्यक्षांसोबत बैठका, त्यानंतर महापालिकेमध्ये जाऊन लोकांच्या कामांचे निराकरण या प्रकारची कामे ते दररोज करत असतात. पक्ष संघटन बांधण्यासाठी काम कसं करावं हे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्याकडून शिकले पाहिजे त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी काम करावे असे देखील इमरान शेख यांनी सांगितले.
आजच्या घडीला 139 नगरसेवकापैकी 25 ते 30 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सभागृहात जातील व ‘अबकी बार सौ पार’ शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांचं स्वप्न पूर्णत्वास आणण्यात खारीचा वाटा उचलतील असे देखील ते म्हणाले. लवकरच सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे कार्य अहवाल पक्षश्रेष्ठी समोर सादर करणार असल्याचे देखील युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख यांनी सांगितले.
शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली व पदाधिकारी यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद या बैठकीस मिळाला. यावेळी महिला शहराध्यक्ष कवीताई आल्हाट,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते पंडित गवळी, ज्येष्ठ नेते मोहम्मद भाई पानसरे,कार्याध्यक्ष राहुल भाऊ भोसले, कार्यअध्यक्ष प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष फजल भाई शेख,पिंपरी, चिंचवड व भोसरी या विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष. नगरसेवक श्याम अण्णा लांडे, पंकज भाऊ भालेकर, विनोद भाऊ नढे, नगरसेवक मयूर कलाटे, सतीश दादा दरेकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ बोऱ्हाडे, ओबीसी अध्यक्ष विजय भाऊ लोखंडे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी,
युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल रावळकर, तुषार ताम्हाने, लवकुश यादव, सरचिटणीस सागर वाघमारे, दीपक गुप्ता, अनुज देशमुख, संकेत जगताप, शहर सचिव अमोल बेंद्रे, ओम शिरसागर, प्रवीण भाऊ खरात व सर्व सन्माननीय सेल अध्यक्ष आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.