शबनम न्युज | सोलापूर
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज(शनिवार) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूरजवळ असल्याची माहिती समोर आली. विजापूर परिसरात झालेला भूकंप ४.६ रिश्टर स्केलपर्यंत नोंदविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने या घटनेस दुजोरा दिला आहे.
कर्नाटकातील विजयापूरपासून १० किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र असून सकाळी ६ .२२ मिनीटांनी धक्के बसले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनानं दिली आहे. भूकंपाची तीव्रता ४ .६ रेक्टर स्केल असून १० किमी इतकी डेप्थ असल्याची माहीती देखील प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत देखील याचे परिणाम जाणवले आहेत. मात्र भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यानं कोणतीही हानी यामध्ये झाली नसल्याचे स्पष्टीकरण देखील प्रशासनानं दिलं आहे.
Advertisement