शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा. आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार ग्रीन मार्शल पथकास बंदी असलेले प्लास्टिक वापरणा-या आस्थापनांवर कारवाई करणे कामी ग्रीन मार्शल पथकांना आदेश दिले होते. त्या अनुंषगाने ग्रीन मार्शल पथकाने दिनांक २०/०७/२०२२ रोजी दवाबाजार चिंचवड येथील सात अस्थापनावर बंदी असलेले प्लास्टिक वापरल्या प्रकरणी र.रू.४०,०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली व संबंधीता कडून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
दिनांक २१/०७/२०२२ रोजी पिंपरी येथेल मुख्य बाजारपेठेत दैलत ट्रेडर्स या आस्थापनेवर कारवाई करून१५० किलो बंदि असलेले प्लास्टिक जप्त केले तसेच संबधित अस्थापनेवर दंडात्मक कारवाई ही केली. दिनांक २२/०७/२०२२ रोजी बाणेर येथील नामांकीत हॉस्पीटलने पिंपरी डेअरी फ्रार्म रसत्यावर त्यांचे बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे निदर्शनास आले बाबत संबंधितावर र.रू.३५,०००/- दंडात्मक कारवाई केली तसेच सदर बायोमेडिकल वेस्ट त्यांच्याकडून उचलुन घेण्यात आले कामी ह क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रीन मार्शल पथकाने हि कारवाई केली.
दिनांक २२/०७/२०२२ रोजी शाहूनगर, चिंचवड येथील नामांकीत हॉस्पीटलने आपला बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकल्या प्रकरणी संबंधीतावर र.रू. ३५,०००/- दंडात्मक कारवाई अ क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी / अंमलदार , महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) जवान आणि तृतीय पंथीय पथके यांचा समावेश असलेल्या ग्रीन मार्शल पथकाकडून सदर कारवाया करण्यात आल्या.