शबनम न्यूज | चिंचवड
कै.सोपानराव जयवंत भोईर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी महिला भजन स्पर्धा आयोजन केले जाते. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी सायं ६ वा मनीषा स्मृति निवास, भोईरनगर, येथे संपन्न झाला. सदर स्पर्धे मध्ये एकूण ३० भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
त्यातील प्रथम परितोषित हा चिंचवड स्टेशन येथील गायत्री महिला भजनी मंडळ यांनी मिळविला तर द्वितीय परितोषितचे मानकरी ठरले तळेगाव दाभाडे येथील रेणुका महिला भजनी मंडळ व ३ रा क्रमांक लिंकरोड चिंचवड येथील स्वरा महिला भजनी मंडळ यांनी पटकाविला. भोईरनगर येथील नारायणी महिला भजनी मंडळ आणि इंदिरानगर संतोषी मा महिला भजनी मंडळाने उत्तेजनार्थ प्राप्त केला. संपूर्ण दिवसभर श्री विष्णुपंत कुलकर्णी यांनी उत्कृष्ट तबलावादन केले. त्याबद्दल या प्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तबला वादक कान्होपात्रा पवार आणि अथर्व माने व पुष्पाताई देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक हि वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली, परीक्षक म्हणून ह.भ.प. मधुकरराव मोरे (दादा) व ह.भ.प. शैलजाताई कुलकर्णी यांनी काम पाहिले बक्षीस वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
तसेच या वेळी फिलिपाईन्स येथे झालेल्या एम टेक ऑटोमोटिव्ह इंजिनिअरींग क्वालिटी सर्कल फोरम यांच्या क्वालिटी कन्सेप्ट वरील जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते पिंपरी चिंचवड शहरातील सुधीर अरविंद अवचार यांचा सत्कार श्री भाऊसाहेब भोईर यांचे जावई श्री गौरव घुले, (राष्ट्रीय खेळाडू) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिं.चिं. शहराध्यक्ष मा. अजित गव्हाणे, मा नगरसेवक . विनायक रणसुभे, श्री गौरव घुले, मा. नगरसेविका वैशालीताई काळभोर, मा. मायाताई बारणे, मा. माधव धनवे पाटील, श्री गतीराम भोईर, संतोष पाटील, सुदाम परब,रा.कॉ. पार्टी पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, दत्तात्रय साकोरे, सहदेव भोईर सौ. प्रतिभा कंकाळे, अजय रावत,चव्हाण सर, मान्यवर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम स्पर्धेचे नियोजन सौ. निलम शिंदे यांनी केले.