शबनम न्यूज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. मुंबई जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी आखण्यात आलेल्या ध्येय-धोरणांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली. पक्षवाढीसाठी संघटनात्मक दृष्टीने काम करण्याबाबत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार शेखर निकम, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सचिव संदेश धुवाळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष रमेश परब, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग उपस्थित होते.