शबनम न्युज | पुणे
गेल्या काही वर्षात भारतातील प्रशिक्षण व नोकरी देणारी विश्वसनीय संस्था म्हणून प्रचलित असलेल्या मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा.लि. कंपनीच्या कोंढवा शाखेचे उदघाटन दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी, तांबोळी इंजिनीअर्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक नजीर तांबोळी सर यांच्या हस्ते व मोलेदिना हायस्कूलच्या प्राचार्या परवीझ निदा मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मल्टी जिनियस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिरोज शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आपल्या कंपनीबद्दल माहिती दिली. मल्टी जिनियस कोंढवा शाखेचे प्रमुख हाफीज शेख यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या शेवटी सिकंदर पठाण सरांनी आभार व्यक्त केले.
मल्टी जिनियस चे व्यवस्थापकीय संचालक फिरोज शेख हे मेकॅनिकल इंजिनीअर, MBA आणि ISO ऑडिटर आहेत. त्यांनी परदेशातील ऑपरेशन्स मॅनेजर या पदाची नोकरी सोडून भारतात 2019 साली ही संस्था सुरू केली. या संस्थेने गेल्या पावणेतीन वर्षांत विविध पदांसाठी 240 हून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत आणि 130 कंपन्यांशी करार केला आहे. फिरोज शेख हे विविध शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन करतात.
मल्टी जिनियस चे मुख्य कार्यालय पुण्यातील कात्रज येथे असून कोंढवा(पुणे) व कोल्हापूर येथे शाखा आहेत. लवकरच संपूर्ण भारत आणि इतर देशांमधील विविध शहरांमध्ये अधिक शाखा सुरू करण्याचे या कंपनीचे नियोजन आहे.