शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी आज पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेतली. व शेखर सिंह यांची आयुक्तपदी नवनियुक्ती झाली याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच शिष्टमंडळ समवेत भेट घेताना कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच शहरातील अनेक विकास कामांबाबत आयुक्तांशी चर्चा केली. शहरातील विविध समस्यांबाबत या समस्यांची माहिती घेऊन आपण या समस्या लवकरच सोडू असे आश्वासनही यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले
Advertisement
यावेळी कविता खराडे , ज्योती गोफने, ज्योती तापकीर , रमा ओव्हाळ , संगीता कोकणे, सुनीता अडसूळ,सविता धुमाळ आदी उपस्थित होते.
Advertisement