शबनम न्युज | मुंबई
शिंदे गटाच्या बंडांनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच चर्चिले जात आहे. विरोधक आणि सत्ताधार्यांनी एकमेकांना चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच राजकारणाला वेगळे वळण लागले असतानाच आता शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीला मराठा सेवा संघाचाही पाठिंबा मिळाला आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच या युतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघानेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ही मराठा सेवा संघातर्फे सांगण्यात आले. मराठा सेवा संघाने पुर्नगठन करुन राज्यात आता जी नवीन युती झालीय, ती समवैचारिक संघटनेची युती आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची राज्यात सत्ता येण्यासाठी पूरक वातावरण मराठा सेवा संघ करेल. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अर्जुन तनपुरे यांनी सांगितले.