शबनम न्युज | पुणे
विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दलची रुचि वाढावी, त्यातील विविध संकल्पनांविषयी त्यांनी सखोल विचार करावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ़ पुणे गांधीभवनतर्फ़े १८ सप्टेंबर रोजी बाल शिक्षण मंदिर, पुणे येथे सायन्स क्विझ आयोजित करण्यात आली होती.
पुणे आणि परिसरातील विविध इंग्रजी व मराठी माध्यमातील शाळांमधून सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी यात उस्फूर्त सहभाग नोंदवला. लिखित MCQ परिक्षा, मॉडेल मेकिंग, व यातून निवडलेल्या गटांचे क्विझ, असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
इस्त्रोचे प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक व नेहरू प्लॅनेटोरीयमचे अरविंद परांजपे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते, तर डिस्ट्रिक्ट यूथ फाउंडेशनच्या डायरेक्टर क्रांती शहा, अध्यक्षा पद्मजा जोशी ,सचिव अश्विनी शिलेदार बक्षीस समारंभास उपस्थित होत्या .क्लबचे सभासद, पालक ,शिक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्या गटांना रोटरी चषकआणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे या ठिकाणी वाटप करण्यात आले.
21सप्टेंबर ला जागतिक शांतता दिन साजरा केला जातो .त्याचे औचित्य साधून सर्वांना शाततेची शपथ देण्यात आली
स्पर्धेचा निकाल :
लेखी परीक्षेत अनुक्रमे बालशिक्षण ,न्यु इंडिया स्कूल व अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल यांना अनुक्रमे पहिला , दुसरा, तिसरा क्रमांक देण्यात आला.
मॉडेल बनवणे स्पर्धेत कलमाडी हायस्कूल, मिलेनियम स्कूल व एसपीएम इंग्लिश मिडीयम स्कूल अनुक्रमे यांना अनुक्रमे पहिला , दुसरा, तिसरा क्रमांक देण्यात आला.
तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेत बालशिक्षण मंदिर चे तीन गट प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानी झळकले .
चौथे बक्षीस अभिनव हायस्कूल ने मिळवले आणि पाचव्या स्थानावर बालशिक्षण शाळेचा गट आला