शबनम न्युज | पिंपरी
दसरा दिवाळी सणा निमित्त महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा भव्य कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच व युनुसभाई स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भोसरी इंद्रायणी नगर येथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार निलेश लंके,राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला,आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे,माजी महापौर योगेश बहल,माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे,माजी नगरसेवक राहुल भोसले ,विनोद नढे, श्याम लांडे ,पंकज भालेकर ,विक्रांत लांडे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, वसंत बोराटे,संजय वाबळे, प्रकाश सोमवंशी,निता ढमाले, विजय लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, आयुष निंबारकर, राहुल पवार, युवा नेते इरफानभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांसाठी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षीस एलसीडी व मानाचे पैठणी कविता तळेकर यांनी पटकावली तसेच दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे पैठणी व वाशिंग मशीन अनुराधा वाघमारे यांनी तर तिसऱ्या क्रमांकाचे मानाचे पैठणी व मायक्रोओव्हन यांना मिळाली तसेच या खेळात सहभागी झालेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू भेट देण्यात आली तसेच कार्यक्रमावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला यात विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे इंद्रायणी भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शक्ती प्रदर्शन केल्याने पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. या कार्यक्रमात अनेक महिला व नागरिकांनी मोठी उपस्थिती लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेला मोठी बळकटी दिली. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्यावतीने करण्यात आले होते.