शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दिल्ली,पंजाब,गुजरात,पाठोपाठ पिंपरी चिंचवड मध्ये ही आम आदमी पार्टीची लोकप्रियता वाढलेली आहे, आज चरोलीतील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळजे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे हा प्रवेश आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
भाजपचे प्रथम महापौर नितीन आप्पा काळजे यांच्याच प्रभागातून दत्तात्रय काळजे हे आप कढुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. प्रवेशावेळी बोलताना दत्तात्रय काळजे यांनी म्हटले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ही जनता भाजप सरकारला कंटाळलेली आहे येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी ची सत्ता पिंपरी चिंचवड मध्ये आल्यास गोरगरीब यांना सुख सुविधा मिळतील. अरविंद केजरीवाल साहेब यांनी दिल्लीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे या कामाचा जगामध्ये डंका वाजला आहे , त्यांचे काम व प्रामाणिक पक्ष हे बघून मी यामध्ये प्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टी डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ अमर डोंगरे , आप पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, सीताताई केंद्रे, भिम मांगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.