शबनम न्यूज : पुणे (दि.२८ डिसेंबर) :- पुण्यातील तरुण दिग्दर्शक सुखदा बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ शूर महिला कोविड योद्धा’ या लघुपटाची नॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठ आणि भारतीय स्त्रीशक्ती यांच्यातर्फे संयुक्तपणे ही राष्ट्रीय लघुपट स्पर्धा भरवण्यात आली असून ‘ब्रेकिंग जेंडर स्टीरिओटाइप ‘हा या स्पर्धेचा विषय आहे .कोविड साथीच्या काळात कर्तव्यासाठी कुटुंबाला दूर ठेवाव्या लागणाऱ्या आरोग्य कर्मचारी महिलेची कथा या लघुपटात मांडण्यात आली आहे .
३ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे .डॉ बाळकृष्ण दिगंबर दामले यांनी निर्मिती केलेल्या या लघुपटात अश्विनी अंबिके,पंकज आचम यांच्या भूमिका आहेत.लेखन पंकज आचम यांचे असून कला दिग्दर्शन सुरेखा धोत्रे यांनी केले आहे.छायांकन विद्यानंद यांचे असून संपादन राजेश देशमुख यांनी केले आहे.मेकअप,पोशाख ही जबाबदारी मोहिनी दामले यांनी सांभाळली आहे .