शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महिलेला शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव मोहिते असे आरोपीचे नाव असून, याच्या विरोधात महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हि घटना ७ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य परिवहन कार्यशाळा दापोडी पुणे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच ठिकाणी कामाला होते. आरोपी हा फिर्यादी यांच्या सोबत जवळीक निर्माण करू लागला, तसेच फिर्यादी यांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शारीरिक स्पर्श करीत होता, तसेच ‘तुला हलके काम देतो, तू मला बाहेर भेट, माझ्या मनाप्रमाणे काम कर तुला जे हवं ते देईल, असे आमिष देऊन शरीर सुखाची मागणी केली. याविरोधात महिलेने फिर्याद दिली असून, आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहे.