शबनम न्युज | पिंपळे सौदागर
पिंपळे सौदागर येथील ट्रायोस सोसायटी व झुलेलाल टॉवर सोसायटीचा प्रलंबित रस्त्यांच्या डांबरीकरणाला मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रयत्नाने सुरुवात करण्यात आली.
प्रभाग क्रमांक २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर सोसायटी,ट्रायोस सोसायटी या सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची डांबरीकरण काही कारणास्तव अनेक वर्ष रखडले होते. त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना पावसाळ्यात व इतर वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या सर्व समस्यांचे उपायोजना करण्यासाठी मा.विरोधी पक्षनेते नाना काटे व नगरसेविका शितलताई काटे यांनी मनपा आयुक्तांकडे व संबंधित मनपा विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याबाबत लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत आज या ट्रायोस सोसायटी व झुलेलाल टॉवर सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांनी नाना काटे व शितल काटे यांचे आभार व्यक्त केले.