शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पूना केरळा जामा-अतुल मुस्लिम संघटने वतीने पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांना तसेच शबरीमालाला जाणाऱ्या भाविकांना फळे आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आली.
या संघटने वतीने गरिबांना अन्नधान्य देणे, अनाथ निराधार गरीब मुलींची लग्ने लावणे, गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे, अनाथ मृतदेहांचे कायदेशीर आणि धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणे, अशी अनेक सामाजिक कामे करण्यात येते. ही संघटना २२ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहे.
या प्रसंगी वॅल्ड मलयाळी काॅसिलचे अध्यक्ष टी.पी.विजयन, के. हरिनारायणन, राजन नायर, सजि वर्की, के.अरविंदाकक्षन, नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड जुलूस कमिटी अध्यक्ष हाजी युसूफ कुरेशी, हाजी गुलाम रसुल, ॲड.इरशाद शेख तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुना केरळा जमा-अतुल मुस्लिमिनचे कार्यकारी अध्यक्ष ए.के.मन्सूर, सेक्रेटरी व्ही.एम.कबीर, ट्रसर ॲड.करीम पुना, पी.आर.ओ. साहूल हमीद बाबू, ईकबाल कॅसिनो, मोईन पुना, हाजरा कबीर व इतर सदस्यांनी केले.