शबनम न्युज | पिंपरी
क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी संघाची कु. श्रावणी सावंत हिची ३२ व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान, लातूर येथे संपन्न झालेल्या राज्य निवड चाचणी किशोर गट कबड्डी स्पर्धेतून कु. श्रावणी सावंत हिची भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने झारखंड येथे २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय किशोर गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
दरम्यान, या खेळाडूचे बाळासाहेब खांडेकर (आयुक्त क्रीडा विभाग पीसीएमसी), अनिता केदारी (क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका), परशुराम वाघमोडे (प्रशासन अधिकारी क्रीडा विभाग), दीपक कन्हेरे (क्रीडा पर्यवेक्षक क्रीडा विभाग), अरूण फुगे (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव), चंद्रशेखर कदम (मा. मुख्याध्यापक) यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूस बन्सी आटवे (क्रीडा शिक्षक) व सोनाली जाधव यांनी मार्गदर्शन केले आहे.