शबनम न्युज | पिंपरी
प्रभाग क्रमांक १४ मधील आकुर्डी खंडोबा मंदिर शेजारील उद्यानसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा मोफत वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निखिल दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ मधील आकुर्डी खंडोबा मंदिर शेजारील उद्यान साठी आरक्षित असलेला भूखंड आरक्षण क्रमांक ८८ या भूखंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता आरक्षित भूखंडावर कुस्ती सामने भरवण्यासाठी अनधिकृत बांधकाम करून कुस्तीचे विट बांधकाम करून आखडा मैदान तयार करण्यात आले आहे. व मोठा मंडप स्टेज बांधण्यात आले आहे जंगी कुस्त्यांचा आखाडा व लावण्य तारका अशा दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनधिकृतपणे उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या आधी ही आम्ही सदर भूखंड उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनाधिकृत मंगल कार्यालय बांधून अधिकृतपणे व्यवसाय केला जात आहे एक दिवसा करता सदर कार्यालयाचे ३५००० रुपये इतके भाडे सामान्य नागरिकांकडून वसूल केले जाते सदर कार्यालय अनधिकृत आहे व महानगरपालिकेच्या उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडामध्ये अनधिकृत पणें बांधलेले आहे.
सदर अनधिकृत मंगल कार्यालयावर अतिक्रमण कारवाई करून सदर भूखंड महानगरपालिकेने ताब्यात घेऊन सदर भूखंडावर जे आरक्षण आहे म्हणजेच या भूखंडावर उद्यानचे आरक्षण आहे म्हणून सदर भूखंडावर उद्यान विकसित करावे अशी तक्रार आम्ही दिनांक ०८/०८/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु मनपा आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून सदर भूखंडावर असलेल्या अनधिकृत मंगल कार्यालयावर कोणती कारवाई करण्यात आली नाही आम्ही वारंवार तक्रारींचा पाठपुरावा करूनही मनपा अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस कारवाई झाली नाही. मनपा या विषयास जबाबदार असलेले अधिकारी उडवा उडविची उत्तरे देत होते म्हणून नाईलाजास्व आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी या विषयास जबाबदार असलेले अधिकारी यांच्या विरुद्ध दिनांक १६/११/२०२२ रोजी आकुर्डी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे ( केस नंबर.R.C.S./43/2022 रजिस्ट्रेशन नंबर.41/2022
CNR.नंबर.MHPU100002102022 ) या प्रमाणे सदर भूखंडाचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही सदर भूखंडाचा अनधिकृत पणे वापर सुरू आहे तरी महानगरपालिका आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी व सदर विषयात जबाबदार असलेले अधिकारी डोळे झाकून बसले आहेत सदर अनधिकृत मंगल कार्यालय रोज भाड्याने दिले जात आहे नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
एका दिवसाकरता ३५००० एवढे भाडे वसूल केले जात आहे उर्वरित मोकळ्या भूखंडाचा मंगल कार्यालयाच्या पार्किंग साठी अनधिकृत पणे वापर केला जातो मनपाची कोणतीही परवानगी न घेता सदर भूखंडा मधे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे महानगरपालिकेचा महसूल बुडत आहे या सर्व बाबी महानगरपालिका आयुक्त व अ क्षेत्रीय अधिकारी व या विषयास जबाबदार संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही महानगरपालिका अधिकारी सदर भूखंडावर कोणतीही कारवाई का करत नाही सदर भूखंडाचा अनधिकृतपणे सुरू असलेला वापर थांबवावा महानगरपािकेने सदर भूखंड ताब्यात घेऊन उद्यान विकसित करावे व उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा अनधिकृत पणे वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.