शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
मागील कोरोना काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून कोविड लसीकरण केंद्राचे व्यवस्थित नियोजन व मार्गदर्शन रोजचे रोज लोकप्रतिनिधींपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत होते व ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे लोकप्रतिनिधींना सोपे जात होते .
आता परत एकदा कोरोनाने डोके वर काढले असून नागरिक धास्तावले आहेत व त्यांच्याकडून कोविड लसीकरणाची मागणी होत आहे.
नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्त पिचीमनपा यांना कोविड लस व बूस्टर डोस लवकरात लवकर सुरू करून लसीकरण केंद्राबाबत माहिती लोकप्रतिनिधी तसेच सोशल मीडिया मार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवावी असे निवेदन दिले आहे.
तसेच या काळात आवश्यक ती काळजी घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी जेणेकरुन संसर्ग वाढणार नाही व दैनंदिन व्यवहारावर बंदचे परिणाम होणार नाही.