शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
कर्मचारी राज्य विमा मंडळ प्रादेशिक बैठकीमध्ये आमदार उमाताई खापरे यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचेकडे लेखी निवेदन देऊन ई एस आय हॉस्पिटल मोहननगर येथे कार्डियाक ॲम्बुलन्स , आयसीयू , एन आय सी यु , सुपर स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व स्टाफ क्वार्टर्स या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी करून घेतली तसेच ई एस आय सी लागू असलेल्या कामगारांना त्यांच्या समस्या , प्रश्न सोडवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर ही सेवा 24 तास सुरू करण्यासाठी ठराव मंजुर करून घेतला.
कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार दिल्लीचे प्रतिनिधी , मालकाचे प्रतिनिधी व कामगारांच्या वतीने कामगार नेते तथा मा.उपमहापौरकेशव घोळवे यांनी सहभागी होऊन बैठकीत महत्त्वपूर्ण सजेशन्स दिले व संबंधित ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवले त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातून १७ टक्के निधी हा ई एस आय सी विभागाकडे जमा होतो उपास २३०० कोटीच्या आसपास परंतु ज्यांच्या वेतनातून कपात होते ते सर्व असंघटित कामगार ई एस आय सी च्या लाभांपासून वंचित राहत आहेत. त्यांना त्यांच्या बेनिफिट्सची माहिती नाही त्यामुळे त्यांना सर्व योजनांची माहिती पॅम्पलेट्स , बुकलेटच्या माध्यमातून मोबाईल ॲप्स च्या माध्यमातून तसेच ज्या आस्थापनेमध्ये काम करतात त्यांचे मार्फत तसेच ई एस आय सी मार्फत प्रशिक्षणातून त्याची व्यवस्था करावी. आय एल ओ मार्गदर्शक तत्वानुसार ट्रायपरटाईट( शासन ,मालक , कामगार प्रतिनिधी) कमिटी नियुक्त करणे. ई एस आय सी ची कव्हरेज मर्यादा २१००० हून ३०००० ज्या जिल्ह्यांमध्ये कामगारआहेत. तेथे नवीन ई एस आय सी हॉस्पिटल बांधणे . ई एस आय सी कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे यासाठी विभागीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी घेणेत आली. २०२३ ते २०२८ या पाच वर्षाचे व्हीजन डॉक्युमेंट्स बनविणे. कामगार व त्यांचे परिवारासाठी हृदयाचे , मेंदूचे , मोठे खर्चाचे आजार ई एस आय सी हॉस्पिटलमध्येच झाले पाहिजेत यासाठी आत्मनिर्भर ई एस आय सी विभाग बनविणे.
ई एस आय सी मेडिकल कमिशनर हे पद महाराष्ट्र राज्यात प्रथमच नव्याने मंजूर करून घेण्यात आले. तसेच एकूण मंजूर पदे व रिक्त असलेली पदे तत्काळ एमपीएससी किंवा सरळ सेवेतून भरण्याचे मंजूर करण्यात आले. कामगार मंत्र्यांनी कामगारांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत जवळपास साडेतीन तास बैठक घेतली व सर्व समावेशक विषय घेऊन मंजूर केले. तसेच दिल्ली येथे लवकरात लवकर विशेष बैठक घेतली जाणार आहे त्याबाबतचा ठराव मंजूर करून घेतला आहे. या बैठकीला उपस्थित कामगार मंत्री सुरेशजी खाडे विधान परिषद आमदार उमाताई खापरे, कामगारांचेवतीने केशव घोळवे ,आरोग्य विभागाचे राज्याचे सचिव, एस आय सी चे केंद्रीय प्रतिनिधी राज्याचे संचालक उपसंचालक विभागीय अधिकारी मालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.