शबनम न्युज | पिंपरी
जपान कराटे डो नोबुकवा हा शितो रियो काय इंडिया या आंतराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन विठ्ठल लॉन्स हिंजवडी या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये आर जे स्पोर्ट्स अकॅडमी पिंपळे गुरव ब्रांच मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पदक प्राप्त केले. सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सन्मानित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण रोहित जाधव,सायली वाघमारे,नीरज खरात हे देत आहेत.
Advertisement