शबनम न्युज | नारायणगाव
नारायणगावजवळील वडगाव-कांदली येथील शेतात १३ जानेवारी रोजी एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकणी महिलेच्या मृतदेहाजवळ पडलेल्या ओढणीवरील उत्पादन बार कोडामुळे महिलेची ओळख पटली असून, जिल्हा ग्रामीण पोलिसांनी संशयित मारेकरी, रोजंदारीवर काम करणाऱ्या व मजुरांना अटक केली. शुभम गुलास्कर (वय. २२, रा. अहमदनगर) आणि कामगार कंत्राटदार मिथिलेश यादव (वय. ३२, रा.बिहार ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेसोबत आरोपींचे प्रेमसंबंध होते. ती अनेकदा दोघांना पैशांची मागणी करत असे, ती अहमदनगर मध्ये अनौपचारिक काम करत होती, तसेच गुलस्कर हि नगर चा रहिवासी असून दोघांत संबंध होते, तसेच महिलेचे यादव सोबत हि संबंध होते. यादव आणि गुलस्कर दोघेही विवाहित आहे, आणि महिला वारंवार भांडण तसेच पैशाची मागणी करत असल्याने दोघांनी मिळून महिलेला पैसे देण्याचे बहाण्याने वडगाव-कांदली येथे बोलावून तिची गळा आवळून हत्या केली. हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान, महिलेच्या मृतदेहाजवळ पडलेल्या ओढणीवरील उत्पादन बार कोडामुळे महिलेची ओळख पटली. महिला ही अहमदनगरच्या एका स्टोअरमध्ये काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी यादव आणि गुलस्कर यांना अटक केली. याबाबत अधिक तपास जिल्हा ग्रामीण पोलिस करीत आहे.