शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांच्या हस्ते भोसरीत ३०० खाटांच्या मेडीकव्हर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदघाटनाप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी रुग्णांच्या सेवेबाबत मेडीकव्हर हॉस्पिटलची प्रशंसा केली.
पवार म्हणाले, “तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवांसाठी डॉक्टर हा सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक संपर्क असतो. पुणे शहराच्या हद्दीत उपलब्ध असलेला मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या विकासामुळेच रुग्णांचा वेळ आणि पैसा तर वाचतोच शिवाय त्यांना कोणतीही तडजोड न करता दर्जेदार सेवा मिळण्याची हमीही मिळते,” असे यावेळी शरद पवार म्हणाले.
रुग्णालयाच्या शुभारंभप्रसंगी केएलई सोसायटीचे अध्यक्ष , डॉ. प्रभाकर कोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, डॉ अनिल कृष्णा, पी हरी कृष्ण, जॉन स्टबिंग्टन, एरिक माल्मबर्ग, आदी मान्यवर उपस्थित होते.