शबनम न्युज | खडकी
पुण्यात तेलंगणातून कौटुंबिक वादातून घरातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षाच्या मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपविले. समरा अवस्थी सोंगाला (वय १३, रा. कपोली, तेलंगणा) असे मुलीचे नाव आहे. या बेपत्ता झालेल्या मुलीला खडकी पोलिसांनी तिच्या कुटुंबांकडे सोपविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी खडकीतील क्रिस्टल सोसायटी परिसरात मुलगी फिरत होती. तिला तेथील नागरिकांनी पाहिले असता, संग्राम सिंग आणि विनोद सिंग यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिच्याशी संवाद साधला तर ती दाक्षिणात्य भाषेत बोलत होती. पोलिसांनी तेलुगु भाषा जाणणाऱ्या एका नागरिकाच्या मदतीने मुलीशी संवाद साधला. तेव्हा तिने तेलंगणातून रेल्वेतने पुण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर तेलंगणातील नशिराबाद पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली असता, ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती खडकी पोलिसांना मिळाली.