शबनम न्युज | चिंचवड
येत्या 26 फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पाडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या वतीने स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह 27 अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचा प्रचार जोरदार सुरू आहे. दरम्यान, आज चिंचवड मध्ये महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संबोधित करताना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “आपल्याला चिंचवड, कसबा पेठ ही निवडणूक जिंकायची आहे, तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, अशी भावनिक साथ घातली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा आपल्या विचारांच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटाला त्यांना त्यांची जागा समजलेली आहे. मात्र आपल्यासाठी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, ज्या प्रकारे पायऊतार व्हावे लागले, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीतून घ्यायचा आहे. मी मागील ३० ते ३२ सालापासून काम करत आहे. याच शहराने मला १९९१ साली पहिल्यांदा खासदार केले होते,” असे अजित पवार म्हणाले.