शबनम न्यूज | पुणे
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) सराव प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदा 100% अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीचेच प्रश्नपेढी दिसत होत्या. त्यामुळे विद्यार्थी पालकांसमोर यावर्षीची प्रश्नपेढी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आज एससीईआरटीच्या संकेतस्थळावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेचा सराव करता येईल. एससीईआरटीने यंदा दहावी आणि बारावीचे शंभर टक्के अभ्यास क्रमांकावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केले आहे. तसेच दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.