शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव (आळंदी). जि. पुणे, येथे, सोमवार, दि.१३/०२/२०२३ ‘सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षि स्व.विलासराव तांबे सर यांची बारावी पुण्यतिथी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनांनी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. राजीव पाटील ( श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, प्रशासकीय सल्लागार), डॉ. हंसराज थोरात ( प्राचार्य,शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय), डॉ. प्रमोद इंगळे ( प्राचार्य, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी ) तसेच श्री.अतुल पानसरे ( मुख्याध्यापक, राजा शिवछत्रपती विद्यालय ), सौ. शितल पाटील ( मुख्याध्यापिका, आदित्य स्कूल) आणि प्रमुख व्याख्याते, प्रा.संजीव कांबळे, मराठी विभाग, इत्यादी उपस्थित होते.
शिक्षणमहर्षि स्व.विलासराव तांबे सर यांनी `महिलांसाठी शिक्षण- सर्वांसाठी शिक्षण´ या ध्येयाने प्रेरित होऊन हा महान असा वटवृक्ष निर्माण केला आहे . उत्तरपुणे- जुन्नर या भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था नसताना मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. संस्थेच्या अनेक शाखा निर्माण केल्या.त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. शिक्षणमहर्षि स्व.विलासराव तांबे सर हे व्याख्याते व शिक्षक होते. असे प्रा.संजीव कांबळे यांनी सांगितले. त्यांनी शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे सर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचा लेखाजोखा मांडला. तसेच अध्यक्षिय मनोगत, व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. हंसराज थोरात यांनी शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे सर, हे शिक्षणाचे इंद्रधनुष्य होते, एक बहूआयामी, जिद्दी,कठोर परिश्रम करणारे असा त्यांच्या जीवनाचा आलेख त्यांनी रेखाटला.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, मा. मयुर ढमाले, (खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ), यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे संकुलातील सर्व शाखेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार, प्रा. रविराज गाढवे यांनी मानले. या कार्यक्रमाचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला. या प्रसंगी उपस्थितांना,श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.