शबनम न्यूज | पुणे
कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १७ रविवार पेठ रस्ता पेठ येथे दि १३. रोजी सायंकाळी शानदार पदयात्रा संपन्न झाली. कामगार मैदान येथून सुरु झालेल्या या पदयात्रेत कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते . धंगेकर यांचे बॅनर व पोस्टर्स यासह फटाक्यांच्या अतेशबाजीसह निघालेल्या या पदयात्रेत तीनही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते.
यावेळी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे वीरेंद्र किराड, ,लता राजगुरू, वैशाली मराठे, कैलास गायकवाड ,राजू शेख ,संदीप आटपळकर, राजेंद्र पडवळ, सुरेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण तरवडे, गणेश नलावडे, वनिता जगताप, बाळासाहेब ढमाले, अभिजित घाडगे, देवेंद्र देशकर, शिवसेना पक्षाचे पल्लवी जावळे ,विशाल धनवडे, जावेद खान, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष भुतकर,मुकुंद चव्हाण, योगेश खेंगरे , भाऊ शिंदे, योगेश येनपुरे,उमेश बोर्डे आदि प्रमुख कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
कामगार मैदान येथून सुरु झालेली पदयात्रा रास्तापेठ व रविवार पेठ या दाट वस्तीतून जात राहिली तेंव्हा ठीकठिकाणी नागरिकांनी दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले . ठीकठिकाणी शीत पेये दिली जात होती वाटेतील सर्व प्रमुख गणेश मंडळांच्या मध्ये धंगेकर यांनी गणपतीची आरती केली .व्यापार्यांनी देखील ठिकठिकाणी त्यांना हार घालून त्यांचे स्वागत केले. या पदयात्रेत तरुण व महिलांचा मोठं सहभाग होता सुमारे ४ तास चाललेली ही पदयात्रा जोगोबा दादा तालीम येथे संपली .तेथे कार्यकर्त्यांनी धंगेकर जिंदाबाद च्या घोषणांनी सारा परिसर दादाणून सोडला.