शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी आमदार, कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकासमोरील त्यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुंडलिक दरवडे, उद्यान अधिकारी धनश्री भांबुरे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य तुषार हिंगे, महाराष्ट्र राज्याचे माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष पोपटराव घोडे, सचिव हनुमंत तरडे, संपतराव घोडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटोळे, जीवन बोराडे, सागर तापकीर, दत्ता शिंदे, गौरव गोसावी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.