शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मंगळवारी (दि. 14) रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती मर्यातीत असल्याने नवे प्रकल्प व मोठ्या कामांना फाटा देण्यात आल्याचे समजते. उत्पन्न वाढीसाठी मिळकत कर व पाणीपट्टी दरात वाढ करण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत 12 मार्च 2022 पासून नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक म्हणून महापालिकेत संपूर्ण कारभार पाहत आहेत. त्यांच्या काळात तयार झालेला हा पहिला अर्थसंकल्प आहे. तो पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात मंगळवारी दिनांक 14 सकाळी 11 ला आयुक्त शेखर सिंह यांना सादर केला जाईल.
Advertisement