शबनम न्युज | पिंपरी
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा मारून एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी शिवार चौक, पिंपळे सौदागर येथील योग द स्पा या ठिकाणी करण्यात आली.
निवृत्ती प्रकाश पाटील (वय 26 रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर) असे अटक करण्यात आलेल्या स्पा सेंटर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
आरोपी निवृत्त पाटील याने स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांनी उपजीविका भागवली. स्पा सेंटरमध्ये वैशाव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली.