शबनम न्युज | चिंचवड
पुनावळे मधील चितळे मिठाईवाले, न्यू पूना बेकरी, श्रीपाद हार्डवेअर या दुकानांमध्ये चोरट्याने चोरी करत रोख रक्कम तसेच चांदीचे नाणी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १५) रात्री साडेनऊ ते रविवारी (दि. १६) सकाळी सातच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वैभव विद्याधर अफजलपूरकर (वय ३०, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या चितळे मिठाईवाले तसेच न्यू पूना बेकरी नावाच्या दुकानांच्या लोखंडी शटर उसकटून चोरी केली. तसेच साक्षीदार आदित्य काकडे यांच्या श्रीपाद हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. आरोपीने श्रीपाद हार्डवेअर दुकानातून २५ हजार ७८० रुपये रोख ,५ हजार रुपये किमतीने चांदीचे नाणी ,पूना बेकरी दुकानातील गल्ल्यातील ३० हजार रुपये रोख तसेच आदित्य हार्डवेअर आणि चितळे मिठाईवाले दुकानातून ८ हजार रुपये रोख असा ६८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल घर फोडी करून चोरून नेला. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास रावेत पोलीस करीत आहेत.