पिंपरी चिंचवड | शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन-तीन दिवसापासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. पावसाचा जोर वाढत असतानाच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज पिंपरी चिंचवड कराना जोरदार पावसाने धो-धो धुतले. तर दुसरीकडे रिक्षा चालकाने भाडे आकारणीत देखील दुप्पट किमतीने वाढ केली.
पिंपरी चिंचवड शहरातील मुकाई चौक येथील बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. रिक्षा चालक ही मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय येथे करत असतात. पावसाच्या जोरदार सरी मुळे रिक्षांचे भाडेही डबल झालेले आज पहावयास मिळाले. मुकाई चौक ते शिरगाव जाण्यासाठी रिक्षा चालक एरवी दीडशे रुपये भाडे आकारत असतो. परंतु आज प्रवाशांनी विचारले असता, मुकाई चौक ते शिरगाव तीनशे रुपये भाडे सांगण्यात येत आहेत. येथे सर्वसामान्यांची लूट झाल्याचा प्रकार आढळून आल्याचे स्पष्ट होते.
एकीकडे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक हे नेहमी त्यांच्या समस्या समोर आणत असतात तर दुसरीकडे प्रवाशांच्या समस्या आढळून आल्या की त्यांना लुटण्याची संधी देखील सोडत नाहीत. असे मत येथील सर्वसामान्य प्रवाशी व्यक्त करत आहेत.