पावसाच्या प्रभावामुळे किवळेमध्ये होल्डिंग कोसळून मोठा अपघात ; पाच जण ठार
आज पिंपरी चिंचवड शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या जोरदार प्रभावामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तर मोठ मोठे होल्डिंग बॅनर पडले. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संरक्षणासाठी किवळेतील कात्रज देहू रोड सर्विस रोडवरील टपरीवर होल्डिंग पडून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सहा क्रेनच्या साह्याने हे होर्डिंग बाजुला करण्यात येत असून नेमके यात किती जण अडकले आहेत हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
बचाव पथकाने एका जणाला होर्डिंगखालून सुखरुप बाहेर काढले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.