शबनम न्यूज पिंपरी-चिंचवड
आकुर्डी दत्तवाडी भागात द्वारकामाई, साई मंदिरापासून ते आकुर्डी गावापर्यंत वाहणाऱ्या नाल्यांमधून ड्रेनेज लाईन गेलेली आहे. यामुळे ड्रेनेज लाईन मधून पाणी वाहने थांबले आहे, असाच प्रकार राहिला तर दत्तवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते तसेच पावसाळ्यात देखील पूरस्थितीचा धोका मोठ्या प्रमाणात असतो, यामुळे सदर धोकादायक बांधकाम त्वरित दुरुस्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेची कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी अक्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आकुर्डी दत्तवाडी भागासह प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळे परिसरातील पावसाचे पाणी, लोकमान्य हॉस्पिटल परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारी मोठी स्टॉर्म वॉटर लाईन लोकमान्य हॉस्पिटल, साई मंदिर मागे ठाणे जनता सहकारी बँकेच्या मागील बाजूस गणेश मंदिर जवळील वाहणाऱ्या नाल्यात येऊन मिळते असे असूनही अक्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाच्या मार्फत काही दिवसांपूर्वी सदर स्टॉर्म वॉटर लाईनही नाल्यातील ड्रेनेज लाईन जोडण्यात आली. या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात पुराची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची संभावना आहे. टेल्को कपूर सोसायटी, माताजी सुपर मार्केट मागील परिसर साई दर्शन नगर, मोरे वाडा, आदर्श मित्र मंडळ, जैन मंदिर साई अपारमेंट व जे.वाय. पाटील बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच लोकमान्य हॉस्पिटल पासून येणाऱ्या स्टॉर्म वॉटर लाईन मधील पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. सदर स्टॉर्म मोटर लाईन नाल्यात ड्रेनेज लाईन ला कल्याणी ड्रेनेज लाईन मधील पाण्याचा प्रवेश थांबून राहिल्याने संपूर्ण दत्त आणि परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, याचा विचार करून सदर पत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असे इखलास सय्यद यांनी सांगितले.