शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
आर टी इ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पालकांना अनेक अडचणी येत असतात या वेगवेगळ्या अडचणी दूर व्हाव्या याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली यावेळी चेतन बेंद्रे यांच्यासह पालकही उपस्थित होते शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत पालकांना सतत वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या एरर येत असल्यामुळे ऍडमिट कार्ड डाउनलोड होत नाही, तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या पालकांकडून शाळा फी च्या नावाखाली कुठल्याही प्रकारची पावती न देता पैसे घेण्यात येत आहेत, काही पालकांचे सर्व कागदपत्रे वैद असून सुद्धा त्यामध्ये पालिका अधिकारी कारण नसताना चुका काढत आहेत, पालकांना अलॉटमेंट लेटर देण्यामध्ये उशीर होत आहे, तसेच डाटाबेस ऑडिट ची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली
या वेगवेगळ्या अडचणी दूर व्हाव्या याबाबत चर्चा झाली या चर्चेत जयदीप सूर्यवंशी सुनील बोदरे पराग ठोंबरे व पालक उपस्थित होते.