शबनम न्युज | पिंपरी
भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुना नगर निगडी आयोजित महिला शौर्य प्रशिक्षण ‘ हर घर दुर्गा अभियान ‘ कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात प्राध्यापिका शैलजा सांगळे मॅडम, प्रा.उत्तम केंदळे (माजी नगरसेवक) व उद्घाटक सौ कमलताई घोलप ( नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका ) प्रशिक्षक श्री विजय तेपुगडे सर .( सीलंबम आंतरराष्ट्रीय विजेते ) श्रीमती विनिता गिरी. (ॲम्बुलन्स ड्रायव्हर करोना काळात त्यांनी भरीव कार्य केले आहे ) प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका शैलजाताई सांगळे या पुणे विद्यापीठातून भूगोल विषयांमध्ये सिल्वर मेडल प्राप्त व २८ वर्षाचा पुणे व मुंबई विद्यापीठातील प्राचार्य पदाचा अनुभव आहे. जगभर फिरून त्यांनी 1000 पेक्षा जास्त कार्यशाळा आजपर्यंत घेतल्या आहेत.
प्रगल्भ अनुभवी शैलजाताई यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले. कमल घोलप यांनी यमुनानगर आणि आपल्या परिसरातील सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन केले आणि आयोजकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक विजय सरांनी लाठी काटी सीलबम याचे प्रात्यक्षिक घेतले व शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं
या प्रसंगी नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी,शरद इनामदार, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख व मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे,मीनल शुक्ल,प्रिया देशमुख,शर्वरी येरगट्टीकर,सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.