शबनम न्युज | मुंबई
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. विविध भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2021 मध्ये परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतला आहे.
विशेष म्हणजे निलंबनाच्या काळात परमबीर सिंह सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे निलंबन मागे घेतले असले तरी ते सेवेत पुन्हा रुजू होऊ शकत नाही. शिंदे फडणवीस सरकारने निलंबनासोबतच परमबीर सिंह यांच्यावर झालेले सर्व आरोपही मागे घेतले आहेत.
Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh. The state government also quashed the suspension orders issued in December 2021 and said that he was on duty during the period of suspension. pic.twitter.com/7ER4Vj21ZQ
— ANI (@ANI) May 12, 2023