शबनम न्युज | पिंपरी
छावा ब्रिगेड संघटना आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आज धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी एमआयडीसी येथे छत्रपती संभाजी महाराजांना सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई आयकर अप्पर आयुक्त डॉ. चव्हाण उपस्थित होते.
या प्रसंगी छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय दादा भोर म्हणाले, ज्याप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते, त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती ही मोठ्या प्रमाणात समाजाने पुढे येऊन साजरी केली पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांची महती येणाऱ्या पिढीपर्यंत जाण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन छत्रपतींचे संभाजी राजांचे विचार जास्तीत जास्त सर्वांपर्यंत जाऊन समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी उद्योजक शिवाजीराव पाटील, रोशन मराठे, कु. दुर्गा भोर, नीलिमा पुराणिक, कल्याण पांचाळ छावा ब्रिगेड पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष, कल्पना बागुल, श्वेता कापसे, सदाशिव पाटील आणि मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित होते.