शबनम न्युज | मुंबई
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो तरूणांच्या रोजगारावर गदा आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने येत्या २० सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात आज मुंबई येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
यावेळी पन्नास खोके-माजलेत बोके, ढोकळा ना फापडो- वेदांता प्रोजेक्ट आपलो, महाराष्ट्राला धोके – सीएमला खोके, ईडी सरकारचा धिक्कार असोअशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस सचिव मनोज टपाल, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement