शबनम न्यूज : मुंबई (दि.२९ डिसेंबर) ;- मराठीभाषा ही अभिजातभाषा असल्याबाबतची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण दालन मुंबईच्या विधानभवनात उभारण्यात आले आहे. मराठी भाषा विभागाने उभारलेले हे दालन दि. २९ ते ३१ डिसेंबर या कालावधित दु. १२ ते रात्री ८ यादरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.
या दालनात नागरिकांना मराठीच्या प्राचीनत्वाची मांडणी करणाऱ्या उदाहरणांसह शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मीळ ग्रंथ, निवडक गाथा आदींच्या प्रतिकृती पाहायला मिळतील. तसेच मराठी भाषेचा प्रवास दाखविणारा ‘शांतता, मराठीचं कोर्ट चालू आहे ’ हा लघुपटही यावेळी दाखविण्यात येणार आहे.
Advertisement