शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ डिसेंबर) :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे विकास करण्याचे अभियान भाजपा महिला आघाडी प्रभाग अध्यक्ष थेरगाव सौ.करिश्माताई सनी बारणे यांनी हाती घेतले आहे. याची सुरुवात त्यांनी आपल्या थेरगाव परिसरात महिला बचत गटाचे उद्घाटन करून केले, महिला स्वावलंबी व्हाव्या महिलांना रोजगार मिळावा महिला सन्मानाने जगाव्या या उद्देशाने, तसेच महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या महिला बचत गटांचे उद्घाटन केले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना शासनाच्यावतीने मिळणाऱ्या योजना व या योजनांच्या मार्फत मिळणाऱ्या सुविधा महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे यावेळी सौ.करिश्माताई सनी बारणे यांनी सांगितले.
सौ.करिश्माताई सनी बारणे भाजपा महिला आघाडी प्रभाग अध्यक्ष थेरगाव,यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगावमध्ये तुळजाई महिला बचत गट,स्वामी समर्थ महिला बचत गट, क्रांतीवीर महिला बचत गट,महालक्ष्मी महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट या महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी थेरगावातील बहुसंख्य महिला ,पदाधिकारी उपस्थितीत होते.या वेळी बचतगटामधील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष काळुराम बारणे, माजी नगरसेवक श्री.सिध्देश्वर बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, संवाद व्यासपीठ चे हरिशआप्पा मोरे, ह.भ.प. सुरेश बारणे, व थेरगावातील असंख्य महिला भगिनी यांच्या उपस्थितीत बचतगटाचे उद्घाटन करण्यात आले.