शबनम न्युज | पुणे
आपल्या खेळीने क्रिकेटचे मैदान गाजविणारा, क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा काल लग्न बंधनात अडकला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्या लग्न समारंभाच्या मेहंदी, हळदी अशा विविध कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. तर काल त्याने उत्कर्षा पवार तिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
Advertisement
गेल्या आठवड्यात चेन्नई सुपर किंग्स ने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराज ने त्याच्या होणाऱ्या पत्नी बरोबर चा फोटो शेअर केला होता. ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांचं लग्न त्यांच्या नातेवाईक व जवळची मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. या फोटोवर ऋतुराजच्या चाहत्यांनी याचबरोबर त्यांचे मित्र मंडळींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
Advertisement