शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली, मोरे वस्ती येथील सोसायट्यांमधील ड्रेनेज लाईनची सफाई करणे गरजेचे आहे. या ड्रेनेज लाईन मधून सांडपाणी तुंबून रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील ड्रेनेज लाईनची सफाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष यश दत्ताकाका साने यांनी फ क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड येथील चिखली, मोरे वस्ती येथील सोसाट्यांमधील ड्रेनेज लाईनची सफाई करणे गरजेचे आहे. लवकरच पावसाळा सुरू होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोरेवस्ती भागातील ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर साचून राहते. शिवाय वर्षभर कोणत्या ना कोणत्या सोसायटीसमोर सांडपाणी तुंबलाच्या घटना घडत असतात. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोरेवस्ती भागातील ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात यावी, असेही निवेदनात यश साने यांनी नमूद केले आहे.