शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. शिवराज्याभिषेक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य सुरू झाले. आणि या ऐतिहासिक घटनेला ३५० वर्ष होत आहेत.
याचेच औचित्य साधत एकदंत हौसिंग सोसायटी-मोशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३डी प्रतिमा बसविण्यात आली आणि शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवरायांच्या प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर श्री राहूलदादा जाधव उपस्थित होते. यावेळी अशा प्रकारे एकजुटीने शिवरायांची एवढी भव्य आणि सुंदर प्रतिमा बसविण्यात आलेली पिंपरी-चिंचवड मधील पहिलीच सोसायटी असल्याचे महापौर राहूलदादा जाधव यांनी सांगितले. तसेच यावेळी नगरसेवक श्री वसंतशेठ बोराटे, नगरसेविका सौ सारिकाताई बोऱ्हाडे, श्री नितीनशेठ बोऱ्हाडे, श्री निलेशशेठ बोराटे, श्री निखीलशेठ बोऱ्हाडे, श्री मंगेशशेठ हिंगणे, श्री संतोषशेठ बारणे, श्री राकेश बारणे, श्री ज्ञानेश्वर बोराटे, श्री स्वप्नील बोऱ्हाडे, इ. उपस्थित होते.
असा हा अनोखा सोहळा आणि उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात सोसायटीचे चेअरमन श्री अजित गवड, सेक्रेटरी श्री पंकज देशमुख ,खजिनदार श्री तुषार तिवटणे, श्री अश्विन डांगे,श्री कृष्णा पाटील, श्री गौरव पाटील, श्री मधुकर सस्ते, श्री निलेश कासार, श्री मयुर नलावडे, श्री सचिन राव, श्री निलेश वरदे,श्री अरूण लड्डे, श्री सचिन पवार , श्री ब्रह्मा जाधव,श्री सुहास पाटील, श्री सागर पाटील, श्री शांतीकुमार गायकवाड, श्री स्वप्नील पठारे, श्री दुलप्पा आगवणे, श्री शुभम पाटील, श्री सुशांत चौधरी ,श्री जीवन चौधरी श्री केरबा ताटे श्री नितीन परदेशी आणि सोसायटीमधील सर्व रहिवासी इत्यादींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अश्विन डांगे यांनी केले…