शबनम न्युज | भोसरी
अभय भोर अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन,भोसरी एमआयडीसी परिसरात उद्योजक कचरा समस्येमुळे त्रस्त झाले असून, एमआयडीसी परिसरात जागोजागी कचऱ्याचे मोठे धिग आढळून येत आहेत तसेच बाहेरील भागातील कचरा एमआयडीसी भागामध्ये आणून टाकला जातो. परंतु याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असून फक्त नावापुरतं स्वच्छता केली जाते. मूळ कचऱ्याचा प्रश्न ने मोठे गंभीर स्वरूप निर्माण झाले असून, कामगारांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर यावर पालिकेने लक्ष न दिल्यास उद्योजकांच्या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या कार्यालया समोर घंटानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
आज कचऱ्यासाठी एमआयडीसी परिसरात गाड्यांची कमतरता तर भासत आहेत. परंतु प्रत्येक एमआयडीसीतील अनेक कॉर्नरला कचऱ्याचे मोठे ढिग आढळून येतात त्यामध्ये पावसाळ्याचे पाणी जाऊन परिसरामध्ये घाणीचे आणि डासांचे साम्राज्य वाढत आहे उद्योजक आपल्या कंपनीमध्ये कचऱ्याचे ढीग साचून ठेवत असून दहा पंधरा दिवस गाड्या उचलण्यात येत नाही परंतु महानगरपालिकेच्या अडल्टप्पू धोरणामुळे उद्योजकांना गप्प बसून मुक्याचा मार सहन करावा लागत असल्याची खंत आहे परिसरात ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे पाऊस पडल्यानंतर कचरा आणि रस्त्यावरील सांडपाणी एकत्रित कंपन्यांमध्ये येत असून त्याचा कामगारांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे आणि कंपन्यांमध्ये कामगार डासांमुळे आजारी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर होतो लवकरात लवकर यावर पालिकेने लक्ष न दिल्यास उद्योजकांच्या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या कार्यालया समोर घंटानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.