शबनम न्यूज प्रतिनिधी
चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील सरपंच फाउंडेशनचे अध्यक्ष देविदास तांबे यांच्या वतीने सी ई टी परीक्षेत 99.16 टक्के गुण मिळवणाऱ्या परीक्षित नारायण सिंह राजपूत तसेच सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली जन्म सोहळा विशेष मध्ये केयांश शिंदे या बालकलाकाराने बाळ निवृत्ती यांची भूमिका साकारली या बालकलाकाराचा सन्मान सत्कार देविदास तांबे यांनी विठ्ठलाची मूर्ती देऊन केला.
सीईटी परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या परीक्षित सहनी हा जय हिंद स्कूल चा विद्यार्थी आहे त्याने आपल्या गुणवत्तेतून आपल्या कुटुंबाचे तसेच गावाचे नाव उंचावले तसेच लहान वयात केयांश शिंदे या बालकलाकाराने मोठ्या वाहिनीवर काम करून आपल्या कुटुंबाला आनंद व नाव मिळून दिले याकरिता त्यांचा हा सत्कार सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनात यश मिळावे अशा शुभेच्छा देविदास तांबे यांनी दिल्या देविदास तांबे यांच्या सह मयूर गवळी, स्वप्नील आभाळे, अभिषेक झगडे ,तात्या शिनगारे नीरज भोसले, मयूरशिनगारे यांचे हस्ते ही या बालकलाकार केयांश शिंदे व परीक्षित सहानी या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला